वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयआरसीटीसीकडून आता क्रूझ लायनर सर्व्हिसची सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनीने एक खासगी कंपनी कॉर्डेलिया क्रूझसोबत हात मिळवणी करत ही सेवा सुरु केली आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी भारतात पहिली स्वदेशी लक्झरी क्रूझ लायनर आपल्या प्रवासाला प्रारंभ करणार असून हा प्रवास मुंबई ते गोवा असा होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
क्रूझ लायनरसाठी जवळपास 150 कॉल्स आले आहेत. प्रवाशांनी वेगवेगळय़ा मार्गांवर जाण्यासाठीची माहिती मागविली आहे. यासोबत दुसरी क्रूझ 25 सप्टेंबर रोजी मुंबई ते गोवा या मार्गावर रवाना होणार आहे.
सदच्या क्रूझमध्ये जवळपास 2,000 प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता आहे. आयआरसीटीसीने जहाजावरुन प्रवास करणाऱयांना गोवा, दीव, लक्षद्वीप, कोच्ची आणि श्रीलंका यासारख्या ठिकाणी भारतीय व आंतरराष्ट्रीय नौकायनाचा अनुभव घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे बरेच प्रवासी हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा केला जात आहे.