वृत्तसंस्था /मुंबई
इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आर्थिक वर्ष 2021-22 मधील जून तिमाहीचे आकडे सादर केले आहेत. गेल्या काही तिमाहीत तोटय़ाचा प्रवास केलेली आयआरसीटीसी एप्रिल ते जून या कालावधीत सावरल्याचे दिसून आले आहे. कंपनीला जून तिमाहीत 82.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती आहे.
कंपनीच्या उत्पन्नात जवळपास 84.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्पन्न वाढीसोबत 244 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या जून तिमाहीत 132 कोटी रुपये उत्पन्न राहिल्याची माहिती आहे.
आयआरसीटीसीच्या संचालक मंडळाने समभाग विभाजनास मंजुरी दिली आहे. आयआरसीटीसीचा एक समभाग पाच समभागात विभाजित करण्यात येणार आहे.
तिकिट बुकिंगमधून महसूल 300 टक्क्यांनी मजबूत केटरिंग सेगमेंटमधून प्राप्त होणाऱया महसूलात 37 टक्क्यांची घसरण राहिली आहे. केटरिंगमधून महसूल वर्षाच्या आधारे 89 कोटी रुपयांनी घटून 56 कोटी रुपयावर आला आहे. दुसऱया बाजूला इंटरनेट तिकीट बुकिंगमधून कंपनीने 300 टक्क्यांनी वाढीव महसूल (149 कोटी रुपये) प्राप्त केला आहे.