प्रतिनिधी /पणजी
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाच्या स्थापनादिनानिमित्त इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय पुस्तक सप्ताह व पोटेट कार्यशाळेचे उद्घाटन इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांच्याहस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ज्ये÷ चित्रकार संजय हरमलकर,सदस्य सचिव अशोक परब, सदस्य सागर जावडेकर, कालिका बापट, उज्जवला तारकर, उपस्थित होते.
यंदा 24 रोजीपर्यंत सात दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून संजय हरमलकर यांची पोटेट कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर आज शनिवार दि. 19 रोजी पं विजय कोपरकर व स्थानिक कलाकारांचा नाटय़संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहे. काव्यवाचन, पुस्तकावर चर्चा. दशावतारी नाटक, आणि 24 रोजी इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचा स्थापना दिन साजरा होईल.असे अशोक परब यांनी सांगितले.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या पुस्क प्रदर्शनात विविध प्रकाशकांची पुस्तके असून यात शालेय, गंभीर विषय, घरगुती उपचारांवरील पुस्तकांचा समावेश आहे. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा, गोवा मराठी अकादमी, कोकणी अकादमी, साहिल प्रकाशन यांची पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.