पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका
वृत्तसंस्था / कोची
भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतची (आयएसी) रविवारी दुसरी सागरी चाचणी करण्यात आली आहे. स्वदेशी विमानवाहू विक्रांत रविवारी कोची येथून दुसऱया सागरी परीक्षणासाठी रवाना झाली. ही स्वदेश निर्मित सर्वात मोठी युद्धनौका आहे.
भारतीय नौदलाने हा देशाचा गौरव वाढविणारा आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. आयएसी विक्रांतच्या दुसऱया परीक्षणासोबतच विशिष्ट क्षमता असणारी, स्वदेशी स्वरुपाने डिझाईन करण्यात आलेली आणि निर्मित तसेच एकीकृत अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका असणाऱया देशांच्या गटात भारत सामील झाला आहे.
आयएसी विक्रांत ही देशात निर्माण करण्यात आलेली सर्वात मोठी युद्धनौका आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या काळात हा ऐतिहासिक क्षण असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे. आयएसीचे डिझाइनर मेजर मनोज कुमार यांनी विमानवाहू नौकेसंबंधी तपशील विशद केला आहे. यात वापरण्यात आलेल्या इस्पातद्वारे तीन आयफेल टॉवर तयार केले जाऊ शकतात, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे.