नवी दिल्ली
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने जादा मायलेज देणारे नवे डिझेल उत्पादन नुकतेच विक्रीकरीता उपलब्ध केले आहे. सदरच्या डिझेलमुळे सदरचे वाहन 5 ते 6 टक्के अधिक मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने एक्स्ट्राग्रीन डिझेल नुकतेच लाँच केले असून इंधन कार्यक्षम व पर्यावरणमैत्रीयुक्त सदरचे नवे डिझेल असेल, असे कंपनीने म्हटले आहे. सदरचे डिझेल देशातील 63 शहरांमध्ये 126 इंधन केंद्रांवर उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.