नवी दिल्ली
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या 5 किलो सिलेंडरचे नामकरण ‘छोटू’ असे केल्याचे सांगितले जाते. आयओसीचा हा छोटा सिलेंडर विविध विक्री केंद्रांवर उपलब्ध केला गेला आहे. आयओसीच्या पेट्रोल पंपांपासून ते इंडेन एलपीजी विक्रेते, किराणा स्टोअर्स याठिकाणीही हा सिलेंडर उपलब्ध करण्यात आला आहे. आपले ओळखपत्र दाखवून कुणालाही हा सिलेंडर घेता येणार आहे. कंपनीचे चेअरमन एस. एम. वैद्य यांनी छोटय़ा सिलेंडरच्या नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम आभासी पद्धतीने केला होता.