नवी दिल्ली
तेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयओसी अर्थात इंडियन ऑईल कॉर्प लिमिटेडला मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीअखेर 8 हजार 781 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यातुलनेत मागच्या वर्षी कंपनीला 5 हजार 185 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. खरंतर नफा 5 हजार कोटींचा होण्याचा अंदाज बांधला जात होता. पण तो अंदाज खोटा ठरवत 8 हजार कोटीच्यावर नफा कंपनीला प्राप्त झाला आहे. इंधन दरात झालेली वाढ तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली 23 टक्के वाढ यामुळे कंपनीने जोरदार नफा कमावला असल्याचे बोलले जात आहे.