-मुक्ता पब्लिकेशनची तपासणी पूर्ण
प्रतिनिधी/कोल्हापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांचे कार्यालय व निवासस्थान यावर आयकर विभागाने गुरूवारी कारवाई केली आहे. कोल्हापूरातील राजारामपुरी येथील मुक्ता पब्लिकेशन कार्यालयाची तपासणी शुक्रवारी रात्री उशीराने पूर्ण झाली. तर शनिवारी तिसऱया दिवशीही पिरवाडी येथील निवासस्थानावर आयकर अधिकारी उपस्थित असून, ते कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूरातील राजारामपुरी येथील मुक्ता पब्लिकेशन कार्यालयाची तपासणी शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान पूर्ण झाली. शनिवारी विजया पाटील यांनी या कार्यालयात उपस्थिती लावली असल्याचे सांगण्यात आले. मात्र पिरवाडी (करवीर) येथील निवासस्थानावर अजूनही आयकर अधिकारी उपस्थित आहेत. मात्र या कारवाइं&बाबत अधिकाऱयाकडून कोणताच दुजोरा मिळू शकला नाही.
गुरूवारपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नातेवाईकाच्यांवर आयकर विभागाने कारवाई केली असून, अजूनही ही कारवाई सुरू आहे. राजारामपुरी येथील तपासणी पूर्ण झाल्याने, हे कार्यालय सुरू होते असे समजते.
पीरवाडी येथील निवासस्थानामधील अनेक महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी उशीरापर्यंत सुरू होती. यासाठी जादा अधिकाऱयांना पाचारण करण्यात आले आहे.