ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 31 जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. आयकर विभागाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
आयकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संकटाचा कठीण टप्पा ओळखून आम्ही 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2019-20 या वर्षात कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी लोक विविध वित्त साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
दरम्यान, केंद्र सरकारने आधार कार्ड पॅनशी जोडण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे.