वृत्तसंस्था /बेंगळूर
फर्निचर व्यवसायाशी संबंधीत असणाऱया आयकिया कंपनीने गुरुवारी बेंगळूरमध्ये ई-कॉमर्स सेवा आणि मोबाईल शॉपिंग ऍप सादर करण्याची घोषणा केली आहे. सदरच्या ऍपच्या आधारे 8,000 पेक्षा अधिक घरगुती सजावटीची उत्पादने ऑनलाइन ग्राहकांना घरपोहोच केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने डिसेंबर 2020मध्ये नवी मुंबई येथे दुसरे आयकिया स्टोअर सुरु केले होते. आयकियाने हैदराबाद, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत आणि वडोदरामध्ये पहिल्यांदा वस्तु ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. आयकियाच्या मोबाईल शॉपिंग ऍपमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीची उत्पादने सहज शोधता येणार असून त्यांचा दर तपासून त्या खरेदी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.