मुंबई
फर्निचर व सजावटी वस्तुंच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया आयकिया कंपनीने मुंबईत भारतातील आपले पहिलेवहिले सिटी स्टोअर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधीची घोषणा नुकतीच कंपनीने केली आहे. सदरच्या नव्या स्टोअरमुळे मुंबईतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. मागच्या वर्षी कंपनीने नवी मुंबईत एक मोठे स्टोअर सुरू केले होते. आता मुंबईत वरळीत कमला मिल्स परिसरात सिटी स्टोअर सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.