प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास आणि बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची मुख्यमंत्री पदकासाठी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱयांनी पोलीस दलामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्याची दखल घेण्यात आली आहे.
बेळगाव उत्तर विभागाबरोबरच जिल्हय़ामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हे जगतातील आरोपींच्या कारवायांना लगाम घातले. समाज विघातक संशयितांनाही जेरबंद करून मुसक्मया आवळल्या. त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन या दोन अधिकाऱयांना मुख्यमंत्रीपदक जाहीर झाले आहे.
राज्यातील 121 वरि÷ पोलीस अधिकाऱयांना मुख्यमंत्री पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. आयजीपी आणि एसपी यांच्यासह इतर अधिकाऱयांनाचाही सत्कार करण्यात येणार असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.