वार्ताहर / सावंतवाडी:
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये आयटीआयच्या दुसऱया फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला 5 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी आपल्या प्रवेश अर्जात ऑनलाईन पद्धतीने बदल करून तो खुल्या प्रवर्गातून निश्चित करावा. सदरचा बदल / दुरुस्ती 30-11-2020 पर्यंत करावी. सदर बदल न केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गात जागा वाटपासाठी ग्राहय़ धरण्यात येईल.
तसेच ज्या उमेदवारांनीसन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्जच भरलेले नाहीत, अशा उमेदवारांना एक विशेष संधी म्हणून 1 डिसेंबर या कालावधीत नव्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चौथ्या प्रवेश फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी जिल्हास्तर समुपदेशन फेरीमध्ये नोंदणी करून गुणवत्तेच्या आधारे जागांचे वाटप करण्यात येईल. सदरची प्रवेश अधिसूचना व प्रवेशाबाबतचे सुधारित वेळापत्रक www.admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अधिकच्या माहितीकरिता नजीकच्या अथवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाहेरचावाडा सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी – 02363-295136 येथे संपर्क साधावा. अथवा संस्थेत प्रत्यक्ष भेटून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.