वृत्तसंस्था/ मुंबई
व्यक्तिगत प्राप्तीकर भरणाऱयांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. उपलब्ध माहितीनुसार प्राप्तीकर परतावा करण्याची पुढे जाण्याची शक्मयता असून सध्याची तारीख ही 31 डिसेंबर आहे. आर्थिक वर्ष 2020-21 म्हणजे एप्रिल 2020 ते मार्च 2021 दरम्यान प्राप्तीकर भरण्यात येणार आहे. सरकारने या अगोदर ही तारीख 31 जुलै वाढवून 30 सप्टेंबर केली होती, पुन्हा ती 31 डिसेंबर अशी केली आहे. परंतु पुन्हा सदरची तारीख बदलण्याची शक्मयता क्यक्त केली जात आहे.
प्राप्तिकर भरणाऱयामध्ये ऑडिट अनिवार्य नसून अशा लोकांसाठीच ही तारीख वाढविण्यात येणार आहे. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार चालू वर्षातील जानेवारीमध्ये 5.95 कोटी प्राप्तीकर 10 जानेवारीपर्यंत भरण्यात आले असल्याची माहिती आहे. याच दरम्यान 15 डिसेंबरपर्यंत 3.59 कोटी प्राप्तीकर परतावा फाईल सादर केल्या आहेत. म्हणजे प्रतिदिन 6 लाख रिटर्न फाईल करण्यात आल्याची माहिती आहे.
मागील वर्षातही तारीख बदलली
मागील वर्षात सरकारने तीनवेळा प्राप्तीकर भरण्याची तारीख बदलली होती. प्रथम जुलै ते नोव्हेंबर आणि डिसेंबर व त्यानंतर 10 जानेवारीपर्यंत प्राप्तिकर भरण्याची तारीख वाढवली होती. अभ्यासकांचे यंदाही अशीच काहीशी स्थिती प्राप्त होणार असल्याची शक्मयता वर्तवली जात आहे.