सेन्सेक्स 393 अंकांनी तेजीत : इन्फोसिस, टीसीएस मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील गुरुवारच्या चौथ्या सत्रात सेन्सेक्सच्या सुरु असणाऱया घसरण सत्राला पूर्णविराम मिळाला आहे. जागतिक बाजारांमधील सकारात्मक संकेतामुळे बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागातील मजबूत स्थितीमुळे सेन्सेक्सने 393 अंकांची मजल मारली आहे.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 392.92 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,699.00 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 103.50 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 15,790.45 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचे समभाग तीन टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. यासोबतच टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग वाढीसोबत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प आणि स्टेट बँक यांचे समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले आहेत.
दुसरीकडे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण राहिल्याने बाजार नफा कमाईत राहिला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेच्या प्रभावामुळे गुंतवणूकदारांनी नफावसुली करण्यास पसंती दर्शवली असल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक बाजारात आशियातील बाजारांपैकी शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीओ हे बाजार लाभासह बंद झाले आहेत.
तेजीची कारणे…
गुरुवारच्या सत्रात मजबूत तेजी प्राप्त होण्यासाठी प्रामुख्याने आर्थिक आणि आयटी क्षेत्रातील मजबूत स्थितीत राहिलेल्या कंपन्यांच्या समभागांचा मोठा लाभ बाजाराला झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. सुधारणात्मक बदलाच्या संकेतामुळे आणि रुपयातील आलेल्या घसरणीमुळे आयटी कंपन्यांच्या कामगिरीने सेन्सेक्सला बळ मिळाले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इन्फोसिस….. 1559
- टीसीएस……. 3373
- टेक महिंद्रा…. 1079
- एचसीएल टेक.. 990
- एशियन पेन्ट्स 3042
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1504
- आयसीआयसीआय 633
- नेस्ले……….. 17664
- एचडीएफसी बँक 1506
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 792
- मारुती सुझुकी 7529
- टाटा स्टील…. 1113
- ऍक्सिस बँक….. 739
- अल्ट्राटेक सिमेंट 6959
- एनटीपीसी…… 118
- बजाज ऑटो… 4227
- बजाज फायनान्स 6042
- हिंदुस्थान युनि 2491
- इंडसइंड बँक.. 1001
- बजाज फिनसर्व्ह 12297
- कोटक महिंद्रा. 1738
- विप्रो………….. 549
- डाबर इंडिया… 575
- डिव्हीस लॅब.. 4258
- ब्रिटानिया….. 3686
समभाग घसरलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2153
- भारती एअरटेल 528
- पॉवरग्रिड कॉर्प. 231
- स्टेट बँक………. 417
- डॉ.रेड्डीज लॅब. 5280
- टायटन……… 1776
- आयटीसी…….. 203
- सन फार्मा……. 664
- रिलायन्स इन्फ्रा.. 87
- कॅनरा बँक……. 149
- ज्युबिलंट फूड. 3167
- एचपीसीएल…. 295
- टाटा पॉवर…… 118
- कोल इंडिया….. 146
- ल्यूपिन……… 1139
- अदानी पोर्ट….. 709