बुधवारी जिह्यात 306 नवे रुग्ण, तिघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतीच आहे. बुधवारी बाधितांच्या संख्येने 300 चा आकडा पार केला असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झालाआहे. हलभांवी येथील आयटीबीपीच्या 45 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सरकारी यंत्रणेला सुरुवातीला असलेले गांभीर्य आता नाही, असे चित्र पहायला मिळते. तपासण्या कमी झाल्या आहेत. या संबंधीची माहिती देण्याची प्रक्रियाही थंडावली असून बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आले नव्हते. जिल्हा आरोग्य विभागाकडून येणारे हेल्थ बुलेटीन तर बंद करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार बुधवारी 306 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व उपनगरातील 60, ग्रामीण भागातील 62 असे तालुक्मयातील एकूण 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधितांची संख्या 20 हजारांच्या दिशेने सुरु झाली आहे. तर गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व उपनगरातील दोन व रायबाग येथील एक असे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव व उपनगरांतील चारहून अधिक खासगी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. सांबरा एटीएस पाठोपाठ हलभांवी येथील आयटीबी कॅम्पमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. मच्छे व कंग्राळी खुर्द परिसरातील राज्य राखीव दलाच्या बलाटीयनमध्येही यापुर्वी मोठय़ा संख्येत रुग्ण आढळून आले होते.
बेन्नाळी, हिंडलगा, मंडोळी, के. के. कोप्प, भेंडीगेरी, राणी चन्नम्मानगर, साईनगर्-मुतगा, शांतीनगर-होनगा, आदर्शनगर, आळवण गल्ली-शहापूर, अनगोळ, कॅम्प, गुरुप्रसाद कॉलनी-टिळकवाडी, गणेशपूर, हिंदवाडी, हुलबत्ते कॉलनी, वडगाव, कोनवाळ गल्ली, कोतवाल गल्ली, महादेवनगर, महालक्ष्मीनगर, महांतेशनगर, मजगाव, माळमारुती, मराठा कॉलनी-टिळकवाडी, मठ गल्ली, सदाशिवनगर, रामतीर्थनगर, शाहूनगर, सैनिकनगर, सह्याद्रीनगर, शास्त्राrनगर, शिवाजी कॉलनी-टिळकवाडी, येळ्ळूर रोड-वडगाव, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.