कर्नाटक राज्य सरकारसोबत कंपनीचा करार
नवी दिल्ली
विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱया आयटीसी लिमिटेड समूहाने कर्नाटकामध्ये 10 लाख एकरच्या क्षेत्रातील ‘वॉटरशेड’ विकास कार्यक्रमासाठी कर्नाटक सरकारसोबत करार केलेला आहे.
कंपनीने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार 5 मार्च 2021 रोजी आयटीसी आणि कर्नाटक वॉटरशेड विकास विभागाच्या अंतर्गत एक करार करण्यात आला असून त्यावर स्वाक्षऱयाही केल्या असल्याचे सांगण्यात येते.
सरदचा वॉटरशेड कार्यक्रम हा ‘आरोग्य विकास 2.0 कार्यक्रमा’चा एक हिस्सा आहे. जो सार्वजनिक-खासगी सहभागामध्ये राबवला जाणार असल्याची माहिती असून याचा उद्देश जल सुरक्षा सुनिश्चित करण्यासह शेतकऱयांना पाणी-हवा बदलामधील प्रभावासोबत लढण्यास मदत मिळणार आहे.