मुंबई
शेअर बाजारात आयटीसी समभागाच्या भावाने बुधवारी 52 आठवडय़ानंतर उच्चांकी स्तर गाठला आहे. हा समभाग एक महिन्याच्या कालावधीत 17 टक्के इतका वधारला असल्याचे दिसून आले आहे.
बुधवारी आयटीसीचा समभाग 1.3 टक्के इतका बीएसईवर वाढीसह 253 रुपयांवर व्यवहार करत होता. यापूर्वी 18 ऑक्टोबर 2021 ला समभागाने 265 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता.