प्रतिनिधी/ बेळगाव
आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेताना चौघा जणांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
उत्सव प्रमोद जाधव, शकील शहापूरवाले, अमिर मुल्ला व चांदवाले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते सर्वजन खडक गल्ली, चांदु गल्ली, खंजर गल्ली येथील राहणारे आहेत. आयपीएलवर बेटिंग घेताना खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व सहकाऱयांनी मंगळवारी रात्री ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या या चौघांकडून बेटिंग खेळताना रोख 15 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.