चेन्नई / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल आवृत्तीसाठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली असून यात विंडीजच्या 56 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचे 42 व दक्षिण आफ्रिकेचे 38 खेळाडू या लिलावात उपलब्ध असणार आहेत. खेळाडूंच्या नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत होती. आयपीएलसाठी 283 विदेशी खेळाडूंनी स्वारस्य दाखवले असून यामध्ये अफगाणिस्तानचे 30, श्रीलंकेचे 31, इंग्लंडचे 21 खेळाडू आहेत. याशिवाय, नेपाळ (8), आयर्लंड, झिम्बाब्वे, अमेरिका (प्रत्येकी 2) व नेदरलँडच्या एका खेळाडूनेही यासाठी नोंदणी केली आहे. आयपीएलसाठी दि. 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे.