बेंगळूर/प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पार्श्वभूमीवर बेंगळूर शहरपोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) मंगळवारी शहरात सट्टेबाजीची आणखी तीन प्रकरणे उघडकीस आणत कारवाई केली.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी याबाबत माहिती देताना बेटिंग प्रकरणी तब्बल चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून ५ लाख जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना असे आढळले आहे की काही ऑनलाइन अॅप्सचा वापर करून बेटिंग केली जात आहे.
यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी सीसीबीने बेटिंग प्रकरणी कारवाई केली होती. शहरातील आयपीएल सट्टेबाजीचे रॅकेट उघडकीस आणत सहा जणांना अटक करण्यात आली आणि ६ लाख रुपये जप्त करण्यात आले.