वृत्तसंस्था/ पुणे
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा 36 वर्षीय अंबाती रायडूने 4000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी येथे झालेल्या गुजरात जायंट्सविरूद्धच्या सामन्यात रायडूने 46 धावांची खेळी केली होती पण चेन्नई संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
अंबाती रायडूला 2018 साली पहिल्यांदा चेन्नई संघाने संधी दिली. त्याने या स्पर्धेत चेन्नई संघाकडून खेळताना 127.88 च्या स्ट्राईकरेटने 1628 धावा जमविल्या. रायडूने भारताचे 55 वनडे सामन्यांत प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएल स्पर्धेत 4000 धावांचा टप्पा ओलांडणारा अंबाती रायडू हा 10 वा भारतीय फलंदाज आहे. चेन्नईच्या धोनीने 4838 धावा, सुरेश रैनाने 5529 धावा आयपीएलमध्ये जमविल्या आहेत.