वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेवेळी विविध संघांतील खेळाडूंची तसेच प्रशिक्षक वर्गाची प्रत्येक पाच दिवसांच्या अंतराने कोरोना चांचणी घेतली जाईल. दरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकवर्ग किमान पाचवेळा घेण्यात आलेल्या कोरोना चांचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक राहील, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या मार्चमध्ये भारतात होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विविध संघांच्या खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गासाठी बीसीसीआयने कोरोनामुळे विशेष नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार सर्व भारतीय क्रिकेटपटू आणि संबंधित संघांचे साहाय्यक प्रशिक्षक वर्गाला प्रारंभी दोनवेळा कोव्हिड-19 चांचणी सक्तीची राहील. या स्पर्धेसाठी आपल्या संघात दाखल होण्यापूर्वी एक आठवडा बाकी असताना त्यांची कोरोना चांचणी घेऊन त्यांना 14 दिवसांच्या कालावधीसाठी क्वॉरेंटाईनमध्ये राहावे लागेल. एखाद्या खेळाडू कोरोना चांचणीत वैयक्तिक दोषी ठरल्यास त्याला दोन आठवडय़ासाठी क्वॉरेंटाईनमध्ये ठेवले जाईल. क्वॉरेंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सदर खेळाडूची 24 तासांमध्ये दोनवेळा कोरोना चांचणी घेतली जाईल आणि या चांचणीत तो निगेटिव्ह ठरल्यास त्याला 19 सप्टेंबरपासूनस संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेसाठी परवानगी दिली जाईल. संयुक्त अरब अमिरातमध्ये क्रिकेटपटूंचे आगमन झाल्यानंतर आठवडाभराच्या क्वॉरेंटाईन कालावधीत कोरोना चांचणी घेतली जाईल आणि सदर क्रिकेटपटू आणि साहाय्यक प्रशिक्षकवर्ग किमान तीनवेळा कोरोना चांचणीत निगेटिव्ह राहणे जरूरीचे आहे. या खेळाडूंचा बायो- बबलमध्ये प्रवेश करण्यात येईल आणि त्यांचा क्रिकेटचा सराव सुरू होईल.
खेळाडू आणि प्रत्येक संघांच्या प्रशिक्षक वर्गाच्या शारीरिक सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी बीसीसीआयच्या या प्रोटोकॉलमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांािगतले. संयुक्त अरब अमिरातमध्ये विविध संघांचे खेळाडू आणि प्रशिक्षकवर्ग दाखल झाल्यानंतर पहिला आठवडय़ामध्ये खेळाडूंना तसेच प्रशिक्षक वर्गाला हॉटेलमध्ये परस्परांना भेटण्यास बंधन घालण्यात आले आहे पण एखादी व्यक्ती कोरोना चांचणीत तीनवेळा निगेटिव्ह असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. या स्पर्धेत सहभागी होणारे विदेशातील क्रिकेटपटू थेट संयुक्त अरब अमिरातमध्ये हवाई प्रवासाने दाखल होणार असून त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजकांनी नियमावली तयार केली आहे. संयुक्त अरब अमिरातला प्रयाण करण्यापूर्वी विदेशी क्रिकेटपटू किंवा विदेशी प्रशिक्षक व्यक्तीला दोनवेळा कोरोना चांचणी घेणे बंधनकारक राहील. या दोन्ही चांचणीत सदर खेळाडू निगेटिव्ह असेल तर त्याला संयुक्त अरब अमिरातला जाण्यासाठी परवानगी द्यावी. संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाच्या क्वॉरेंटाईन कालावधीला प्रारंभ होईल. या कालावधीत सदर खेळाडूंची आणि प्रशिक्षक वर्गाची कोरोना चांचणी पहिल्या, तिसऱया आणि सहाव्या दिवशी केली जाईल. सदर आयपीएल स्पर्धा 53 दिवस चालणार असून या कालावधीत प्रत्येक पाच दिवसांनी प्रत्येक खेळाडूंची कोरोना चांचणी सक्तीची राहील, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. 20 ऑगस्टपूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांना संयुक्त अरब अमिरातकडे हवाई प्रवास करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.