48 कंपन्यांच्या मदतीने मजबूत कामगिरी : पुढील आठवडय़ापर्यंत 1.19 लाख कोटीवर जाण्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून भारतीय बाजारात चर्चा असणाऱया आयपीआंsनी सर्व विक्रम चालू वर्षात मोडीत काढले आहेत. यामध्ये चालू वर्षात आतापर्यंत 48 कंपन्यांनी बाजारात आयपीओच्या मदतीने 96,145 कोटी रुपयाची रकम जमा केली आहे. यासह येत्या आठवडय़ापर्यंत हा आकडा वधारुन 1.19 लाख कोटी रुपयाच्या घरात जाणार असल्याची माहिती आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाच आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे दिसून आले यामध्ये कंपन्यांच्या मजबूत कमाईमुळे विक्रमी स्थिती प्राप्त केली आहे. यामध्ये सेन्सेक्स 62,000चा नवा विक्रम प्राप्त केला असून दुसऱया बाजूला निफ्टीने 18 हजारची उंची प्राप्त करत नवा विक्रम नेंदवला आहे.
48 कंपन्यांचा बाजारात प्रवेश
उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत 48 कंपन्यांनी बाजारामध्ये चालू वर्षात 96,145 कोटी रुपये उभारले आहेत. यामध्ये सर्वात मोठा इश्यू हा झोमॅटोचा राहिला असून 9,375 कोटी रुपये होता. आगामी तीन आठवडय़ात आयपीओ बाजारात येत असून तीन कंपन्या 21 हजार कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. यामध्ये पेटीएमचा सर्वात मोठा आयपीओ 18,300 कोटी रुपयाचा राहणार असल्याचे संकेत आहेत.
38 कंपन्यांना लिस्ट चालू वर्षाची तुलना ही सोबत केल्यास आतापर्यंत विक्रमी कामगिरीसह दुप्पट नोंद करत आयपीओमधून एकूण 75 हजार कोटी रुपये जमा केले असून तत्कालीन वर्षात 38 कंपन्यांना लिस्ट झाल्या होत्या.