मे-जून महिन्यात 9 कंपन्यांचे आयपीओ येणार – बाजारात तेजी येण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
गुंतवणूकदारांसाठी पुन्हा नवीन कंपन्यांमध्ये मे व जून महिन्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत 9 कंपन्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सादर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून यामध्ये शेअर बाजारातील तेजीच्या वातावरणाचा लाभ होणार असल्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत.
सदरच्या 9 कंपन्यांमध्ये डोडला डेअरी, इंडिया पेस्टीसाइड्स, केआयएमएस हॉस्पिटल, आरोहण फायनान्शिअल, सोना कॉमस्टार, सेव्हन आइसलँड्स, ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस, श्याम मेटॅलिक्स आणि इएसएएफ स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश होण्याचा अंदाज आहे.
मे-जून मधील आयपीओ सादर करणाऱया मुख्य कंपन्यांची थोडक्यात ओळख…
केआयएमएस हॉस्पिटल्स ः कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (केआयएमएस) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील सर्वात मोठा कॉर्पोरेट हेल्थकेअर गुप आहे. कंपनी इश्यूच्या आधारे 700 कोटी रुपयांचा निधी जमा करणार असल्याची माहिती आहे. यासाठी 200 कोटी रुपयांचे पेश समभाग आणि 2 कोटी 13 लाख 40 हजार इक्विटी समभाग आयपीओच्या आधारे सादर करणार आहे.
आरोहण फायनान्शिअल ः पुढील महिन्यात 1,750 ते 1,800 रुपयांचा आयपीओ सादर करण्याचे संकेत आहेत. यासाठी कंपनी 850 कोटी रुपयांचे प्रेश समभाग सादर करणार असून याच्या व्यतिरिक्त आयपीओच्या मदतीने 2 कोटी 70 लाख 55 हजार 893 इक्विटी समभाग सादर करणार आहे.
इंडिया पेस्टिसाइड्स ः कंपनी शेतीसाठी लागणाऱया केमिकलचे उत्पादन घेते. कंपनी आयपीओच्या आधारे प्रायमरी मार्केटमध्ये 800 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याच्या तयारीत आहे. याकरीता कंपनी 100 कोटी रुपयांचे प्रेश समभाग आणि सध्याची गुंतवणूक ऑफर फॉर सेलमध्ये 700 कोटींचे समभाग विकणार असल्याचेही म्हटले आहे.
डोडला डेअरी ः दक्षिण इंडिया बेस्ट डेअरी कंपनी 800 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणणार असून याचे सादरीकरण मे महिन्यात करणार असल्याचा अंदाज आहे. यासाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनी आयपीओसाठी 50 कोटी रुपयांचा प्रेश समभाग सादर करणार आहे. ऑफर फॉर सेलच्या अंतर्गत 1 कोटी 85 हजार 444 इक्विटी समभागाची विक्री करणार आहे.
सोना कॉमस्टार ः देशातील सर्वात मोठी ऑटो पार्ट्सचे उत्पादन घेणारी सोना बीएलडब्लू प्रीसिजन फॉर्गेग्स असून या कंपनीला सोना कॉमस्टार नावानेही ओळखले जाते. कंपनी प्रायमरी मार्केटमधून 6000 कोटी रुपये जमा करणार असल्याचेही सांगितले आहे.
श्याम मेटालिक्स ः कंपनी स्टील निर्मितीचे काम करत असून आयपीओमधून 1,107 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनी जून महिन्यात आयपीओ सादर करणार आहे. यामध्ये 657 कोटी रुपयांचे प्रेश समभाग सादर करण्याचे संकेत आहे.
सेव्हन आयलँड्स शिपिंग ः सीबॉर्न लॉजिस्टिक्स कंपनीच्या आयपीओला बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. समुद्र मार्गाने साहित्याची उलाढाल करणारी ही कंपनी आयपीओच्या मदतीने 600 कोटी रुपये जमा करणार आहे.
ग्लेनमार्क लाईफ सायन्स ः फार्मा कंपनी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रडिएट्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही सहकारी कंपनी आहे.