ऍपलच्या म्युझिक, ऍप स्टोअर सेवा ठप्प : काही वेळानंतर सेवा सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज कंपनी ऍपल यांच्या म्युझिक, ऍपल टीव्ही, ऍप स्टोअर, पॉडकास्ट, कॉन्टॅक्ट्स आणि ऍपल आर्केडसह जवळपास डझनभर वेब सेवा सोमवारी जगातील काही विभागात बंद झाली होती. ऍपलने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. असं जरी असलं तरी आता सेवा पूर्ववत झाल्याचे सांगण्यात येते.
सर्व सेवा या सोमवारी दुपारी एक नंतर पुन्हा सुरु झाल्याची माहिती आहे. कंपनीच्या सिस्टम स्टेटस पेजसह पॉडकास्ट, म्युझिक आणि आर्केडसह 11 सेवा बंद असल्याचे दिसून आले होते.
सोशल मीडियावर माहिती शेअर
ऍपल सर्व्हिस अप-टाइम डॅशबोर्डच्या माहितीनुसार भारतामधील युजर्सना आय क्लाउडचे काही फिचर्सचा वापर करण्यात अडचणी येत होत्या. यामध्ये कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स आणि प्रायव्हेट रिलेसोबत ऍपल मॅप्स व फाइंड माय नेटवर्कसारख्या सेवांमध्ये अडचणी राहिल्या होत्या. काही तासांच्या अडथळय़ानंतर सदरची समस्या दूर होऊन सेवा सुरळीत झाली. सोशल मीडियावर या संदर्भात माहिती शेअर करण्यात आल्याचे दिसून आले.
कॉर्पोरेट युजर्सनाही समस्या जाणवल्या
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार सोमवारी झालेल्या नेटवर्क अडथळय़ाला दूर सारण्यात आले. यामुळे ऍपल म्युझिक, आय क्लाउड आणि ऍपल स्टोअरदेखील ऑफलाईन झाले होते. दुसरीकडे आयफोन व दुसऱया ऍपलसह कॉर्पोरेट युजर्सना या समस्येला सामोरे जावे लागले आहे.