वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
ऍपल कंपनी आयफोन निर्मितीमधील जगातील अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीची तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख आहे. ऍपल आयफोन 12 या आवृत्तीअंतर्गत चार फोन्स सादर करणार आहे. कंपनीने आयफोन एसइ(2020) च्या बाबतची माहिती सादर केली आहे.
आयफोनच्या 12 आवृत्तीत आयफोन 12, आयफोन 12मॅक्स, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स आदी मॉडेलचा समावेश आहे. सदरहू आयफोनचे सादरीकरण येत्या 2021 पर्यंत होणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. आयफोनची किमत ही 75 हजारपासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.
फिचर
सदरच्या आयफोनमध्ये सर्वात लहान डिव्हाईस राहणार असून याला 5.4 इंच आकाराचा सुपर रेटिना ओएलईडी डिस्प्लेची सुविधा मिळणार आहे. 4 जीबी रॅम आणि 256 जीबी क्षमतेच्या स्टोरेजची सोय असणार आहे. फोन ऍल्युमिनियम बॉडीचा असणार आहे. सोबत ए 14 चिपसेट, 5 जी कनेक्टिव्हीटी आणि डबल कॅमेराची सोय उपलब्ध होणार आहे.