लाँचिंगची तारीख व्हायरल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपलचे आगामी उपकरण सादर होणार असून त्यासंदर्भातील तारीख समोर आली आहे. प्राप्त अहवालानुसार आयफोन 14 आवृत्ती, एअर पॉड्स प्रो 2 आणि तीन ऍपल वॉच आदी सप्टेंबर महिन्यात होणाऱया ऍपलच्या कार्यक्रमात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदरचा आगामी कार्यक्रम ऑफलाईन किंवा ऑनलाईन असणार आहे की नाही यासंदर्भातील माहिती ऑगस्टच्या अंतिम क्षणापर्यंत प्राप्त होण्याची माहिती आहे. याचदरम्यान ऍपलची 6 जूनपासून वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (डब्लूडब्लूडीसी) घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
आयफोन 14 आवृत्ती
क्यूपर्टिनो स्थित टेक दिग्गज यांच्या सप्टेंबरमधील कार्यक्रमादरम्यान आपला आयफोन 14 आवृत्ती सादर करण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये आयफोन 14 आयफोन 13 याप्रमाणेच दिसतो आणि मागील वर्षात ऍपल ए15 चिपसह असून थोडा अत्याधुनिक राहणार आहे यात 6.1 ते 6.7 इंच आकाराची स्क्रीन मिळणार आहे. तसेच याला ऍपल ए 16 नाव दिले जाण्याचे संकेत आहेत.
ऍपल वॉच8, वॉच एसइ, वॉच एक्सट्रीम
अमेरिकन टेकमधील दिग्गज कंपनी ऍपल चालू सप्टेंबरमध्ये तीन ऍपल वॉच, ऍपल वॉच आवृत्ती 8, नवीन वॉच एसइ आणि वॉच एक्सट्रीम आवृत्ती बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.