वृत्तसंस्था/ डब्लीन
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या सरावाला प्रारंभ केला असून नेटमध्ये करण्यात येणाऱया सरावासाठी आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलची निवड करण्यात आली.
चेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजांना नेटमधील सरावावेळी आता लिटल गोलंदाजी करणार आहे. 2022 आयपीएल क्रिकेट हंगाम 65 दिवसांचा राहणार असून यामध्ये लीगमधील 70 तर प्ले ऑफमधील चार सामने खेळविले जातील. पंधराव्या आयपीएल स्पर्धेला 26 मार्चपासून मुंबईत प्रारंभ होईल.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विद्यमान विजेते चेन्नई सुपरकिंग्स-कोलकोता नाईट रायडर्स यांच्या सलामीचा सामना खेळविला जाईल. 27 मार्चला या स्पर्धेच्या लीग टप्प्यातील पहिल्या डबल हेडरला प्रारंभ होईल. डबल हेडर सामने दिली कॅपिटल्स-मुंबई इंडियन्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर तसेच पंजाब किंग्स-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. 2022 आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना 29 मे रोजी खेळविला जाईल.