वृत्तसंस्था/ लंडन
केव्हिन ओब्रायन आणि पॉल स्टर्लिंग यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आयर्लंडने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत झिम्बाब्वेवर 3-1 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या चौथ्या सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा 64 धावांनी पराभव केला. या सामन्यात आयर्लंड संघाने 20 षटकात 4 बाद 174 धावा जमविल्या. ओब्रायनने 47 तर स्टर्लिंगने 39 धावा झळकविल्या. या जोडीने 89 धावांची भागिदारी केली. ओब्रायनने या मालिकेतील दुसऱया सामन्यात अर्धशतक झळकवले होते. झिम्बाब्वेने 20 षटकात 9 बाद 110 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 64 धावांनी गमवावा लागला. आयर्लंडच्या ऍडेरने 23 धावांत 4 गडी बाद केले. झिम्बाब्वेच्या डावात एर्विनने 28 धावा जमविल्या. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ब्रॅडी येथे शनिवारी खेळविला जाणार आहे.