नवी दिल्ली
आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंडय़ाकडे आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या छोटेखानी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्ध 2 लढती अनुक्रमे दि. 26 व 28 जून रोजी डबलिन येथे खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्राचा युवा फलंदाज राहुल त्रिपाठीला येथे पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याने अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत हैदराबादतर्फे 400 पेक्षा अधिक धावांचे योगदान दिले होते. संजू सॅमसनला येथे पुनरागमनाची संधी देण्यात आली. भुवनेश्वर उपकर्णधार असणार आहे.
भारतीय टी-20 संघ ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.