प्रतिनिधी / बार्शी
सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना आज सायंकाळी 05:40 दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे वरवडे टोल नाकानजीक वाहन केसेससाठी थांबलेले असताना हैदराबाद हुन मुंबईला निघालेला आयशर टेम्पो क्र. एम एच ०४ एचडी झिरो ०१७० ने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे (वय ३४ रा. अलीपूर रोड बार्शी जिल्हा सोलापूर) यांना धडक दिली. या घटनेत श्री चौबे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असून पाकणी सोलापूर महामार्ग पोलिस पथकातील विशाल चोबे यांचे ते बंधू होत.