प्रतिनिधी/ निपाणी
आयशर ट्रकची ऊस ट्रॉलीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे 5 वाजता घडली. रामगोंडा फकीरगौडा (वय 25 रा. बानगे, ता. कागल) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आयशर ट्रक क्र. (केए 05 एके 2681) हा निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने कुरीअरचे पार्सल घेऊन जात होता. चालक रामगोंडा याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने ऊस ट्रॉलीला जोराची धडक दिली. त्यात आयशरच्या समोरील भागाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. जखमी रामगोंडा याना 108 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पायोलाईन कंपनीचे अधिकारी प्रकाश बामणे, पोलीस सागर कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.