नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने सोमवारी एक नवीन प्रकारची बँकिंग सेवा सुरू केली आहे. आता आयसीआयसीआय बँक व्हॉट्सऍपवर आपल्या ग्राहकांना बँकिंग सेवा देणार आहे. जेणेकरून कोरोना विषाणू लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांना सर्व आवश्यक बँकिंग सेवा घरी मिळू शकतील. व्हॉट्सअŸपवर उपलब्ध असलेल्या सेवेद्वारे ग्राहक आपल्या बचत खात्यातील शिल्लक, मागील तीन व्यवहार, पेडिट कार्ड मर्यादा, त्वरित कर्ज सुविधा याशिवाय ब्लॉक / अनब्लॉक पेडिट आणि डेबिट कार्ड तपासू शकतात. त्याचबरोबर ग्राहकांना जवळील तीन आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम आणि शाखांविषयीही माहिती मिळू शकणार आहे.