मुंबई
आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाईफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2022 च्या नऊमाहीमध्ये कोव्हीड-19 संबंधित दाव्यांसाठी 982 कोटी रुपयांची विमा पूर्ती केली आहे. दावा पूर्ण करण्याचे गुणोत्तर 97.9टक्के, या कालावधीत विना-तपास मृत्यू दावा पूर्ण करण्यासाठीचा सरासरी वेळ 1.4 दिवस इतका होता असे कंपनीने जाहीर केले आहे. व्हॉटस्ऍप आणि चॅट बॉट लिगो यांसारख्या डिजिटल साधनांमुळे ग्राहकांना त्यांचा दावा दाखल करण्यासाठी आणि त्याचा ट्रक तपासण्यासाठी सुरक्षीत, जलद आणि सोयीचा मार्ग कंपनीने त्याकाळात पुरविला. डिजिटलीकरणामुळे कंपनीला केवळ 3 दिवसांत 65 लाख विमा योजना जारी करणे शक्मय झाले. ग्राहकांना ऑनलाईन विम्याची सर्व माहिती उपलब्ध झाल्याने सुलभ सेवेचा लाभ ग्राहकांना झाला.