वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आयसीआयसीआय बँकेची ‘कार्डलेस ईएमआय’ ही संपूर्णपणे डिजिटल स्तरावर काम करणारी सेवा सुरु करण्यात आली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत नवीन ग्राहकांना विना कार्ड आपल्या मोबाईल आणि पॅन नंबरचा वापर करुन गॅजेटसह घरगुती उपकरणांची खरेदी ग्राहकांना करता येणार असल्याचे बँकेने सांगितले आहे.
क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्ससोबत करण्यात आलेल्या करारानुसार ग्राहक आपल्या नेंदणीकृत मोबाईल नंबर, पॅन आणि ओटीपीला रिटेल आउटलेट्सवर पीओएस मशीनवर इनपुट केल्यानंतर पेमेंटला ‘नो कॉस्ट ईएमआय’मध्ये बदलणार असल्याचे बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. सुविधा घेणारा आयसीआयसीआय बँकेचा ग्राहक असायला हवा किंवा त्याला आपल्याला या सुविधेचा लाभ मिळणार असल्याची माहिती हवी. याच्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन ‘सीएफ’ लिहून ‘5676766’ वर एसएमएस पाठवावा लागणार आहे.