कोविड-19 चा प्रभाव ः मानसिक नैराश्याची समस्या
इंग्लंडमध्ये कोविड-19 महामारीदरम्यान अतिदक्षता विभागात कार्यरत सुमारे निम्म्या कर्मचाऱयांना सध्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱयांना आता मृत्यूचा पर्याय अधिक उत्तम वाटण्याइतके ते नैराश्यात पोहोचले आहेत. यासंबंधीचे अध्ययन बुधवारी प्रकाशित करण्यात आले आहे. अध्ययनानुसार रुग्णालयांमध्ये काम करणाऱया परिचारिका आणि डॉक्टरांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) ची प्रकरणेही दिसून आली आहेत. हा एक चिंतेचा विकार असून पीडित लोकांनी अत्यंत तणावाच्या आणि वेदनादायी घटनांना तोंड दिले आहेत. यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी अत्यंत कठिण ठरले आहे. तणावाची ही लक्षणे गंभीर असल्याने डॉक्टर तसेच परिचारिका स्वतःलाच नुकसान पोहोचवत आहेत, काही जणांमध्ये आत्महत्येची प्रवृत्तीही दिसून आल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.