वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आपले अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकनात बुमराह तिसऱया स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱया आणि तिसऱया सामन्यात अनुक्रमे 89 आणि 63 धावा झळकविल्याने कर्णधार कोहलीने आयसीसीच्या मानांकनातील आपले अग्रस्थान राखले आहे. या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत कोहली 870 गुणांसह पहिल्या, रोहित शर्मा 842 गुणांसह दुसऱया, पाकचा बाबर आझम 837 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत प्रथमच खेळणाऱया अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने पहिल्या सामन्यात 90 धावा तसेच तिसऱया सामन्यात नाबाद 92 धावा झळकविल्याने त्याने फलंदाजांच्या मानांकन यादीत 553 गुणांसह 49 वे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच 791 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने वनडे मालिकेत दोन शतके झळकविल्याने त्याने या मानांकन यादीत 707 गुणांसह पंधरावे स्थान मिळविले आहे.
वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत न्यूझीलंडचा बोल्ट 722 गुणांसह पहिल्या, अफगाणचा मुजिब उर रेहमान 701 गुणांसह दुसऱया तर भारताचा जसप्रित बुमराह 700 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या झंपाने या यादीत 623 गुणांसह 14 वे स्थान तर हॅजलवूडने सहावे स्थान मिळविले आहे.