दुबई / वृत्तसंस्था
आयसीसीने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांची आयसीसी क्रिकेट समिती अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. राष्ट्रीय सहकारी अनिल कुंबळे यांनी 3 वर्षांचे तीन टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांची जागा गांगुली यांनी घेतली. ‘आयसीसी पुरुष क्रिकेट समिती अध्यक्षपदी गांगुली यांची निवड जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे3़, असे आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यावेळी म्हणाले. विंडीज क्रिकेटचे सीईओ जॉनी ग्रेव्ह हे आयसीसी महिला क्रिकेट समितीचे नवे अध्यक्ष असतील, असेही आयसीसीने यावेळी जाहीर केले.