प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय वैद्यक संघटना म्हणजेच आयएमएच्या डॉक्टरांनी शुक्रवारी ओपीडी सेवा बंद ठेवल्या तर आयुष डॉक्टरांनी नियमित आपल्या सेवा सुरू ठेवल्याच, शिवाय रूग्णांवर विनामूल्य उपचार केले. आयुष आणि आयएमए च्या वादात कधी नव्हे ते रूग्णांना मात्र विनामुल्य उपचार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
आयुर्वेर्दीक अभ्यासक्रमात सर्जरी करण्याचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याला आयएमएचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी सेवा स्थगित केल्या. तर आयुष फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी रूग्णांना विनामुल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला.
आयुष मध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिद्ध व योगा यांचा समावेश आहे. मिक्सोपॅथीला आयएमएचा विरोध आहे. मात्र आयुषची त्यासाठी मान्यता आहे. त्यामुळे आयएमएने बंद पुकारताच डॉक्टरांनी शुक्रवारी विनामुल्य सेवा दिली.