राज्यस्तरीय अग्रमानांकन टे टे स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे राज्य अग्रमानांकन टेबलटेनिस स्पर्धेत यशस्विनी घोरपडे हिने खुल्या महिला गटात व 19 वर्षाखालील गटात विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकाविला. कॅडेट गटात बेळगावची आयुषी गोडसे, मोनिश नंदी नारा यांनी विजेतेपद पटकाविले.
बेंगळूर येथे मल्लेश्वरम येथे झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या खुल्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात यशस्विनी घोरपडे हिने अनारगा मंजुनाथ हिचा 8-11, 11-7, 11-9, 11-3, 11-6 तर दुसऱया उपांत्य सामन्यात मरियाने संयुक्ता ए हिचा 12-10, 3-11, 11-5, 8-11, 11-5, 11-1 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत यशस्वीनी घोरपडेने मरिया ऑनीचा 11-9, 11-7, 11-7, व 11-8 अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद मिळविले. 19 वर्षाखालील ज्युनियर मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सहनाने करूणा जी हिचा 8-11, 11-9, 11-7, 11-9, 11-9 तर दुसऱया उपांत्य सामन्यात यशस्विनी घोरपडे हिने अनर्गा मंजुनाथ हिचा 11-7, 11-7, 11-6, 11-8 अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम सामन्यात यशस्विनी घोरपडेने सहना मूर्तीचा 11-4, 11-9, 11-6, 12-10 अशा सेटमध्ये पराभव करीत विजतेपद पटकाविले.
कॅडेट गटात मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मोनिश नंदी नाराने आर्य जैन याचा 11-9, 11-9, 11-2 अशा सेटमध्ये तर दुसऱया उपांत्य सामन्यात अर्णवने सुशांत रामास्वामी याचा 5-11, 11-6, 6-11, 11-7, 11-8 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात मोनिश नंदी नाराने अर्णव एन याचा 10-12, 11-6, 15-13, 11-7 अशा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या कॅडेट गटात पहिल्या उपांत्य सामन्यात निशीने सुमीदा भट हिचा 11-5, 11-6, 11-8 तर दुसऱया उपांत्य सामन्यात आयुषी गोडसेने वृषाली किनी हिचा 11-7, 9-11, 4-11, 11-5, 14-12 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आयुषी बाळकृष्ण गोडसे हिने निशी शास्त्राr हिचा 3-11, 11-7, 11-9, 4-11, 11-4 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.