कोरोना बाधितांवर मोफत उपचार : योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड राखीव
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्याने रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड तसेच साधे बेड मिळत नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड राखीव ठेऊन गरजूंवर उपचार करण्याची सूचना शासनाने केली आहे. शहरातील 19 रुग्णालयात आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्यमित्र हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परिणामी जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील बनले आहे. काही ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असले तरी त्या ठिकाणी उपचार घेणे महागडे बनले आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी पॅकेजप्रमाणे उपचाराचे दराचे पॅकेज ठरले आहे. कोरोना बाधितांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यास लाखांच्या घरात औषधोपचाराचे बिल होत आहे. त्यामुळे गरीब जनतेला कर्ज घेण्याची वेळ आली आहे. खासगी रुग्णालयातील औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने रुग्णांवर घरी उपचार करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालयात मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरांतील 19 खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोरोना बाधितांवर उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खाली दिलेल्या अधिकाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णालयाचे नाव | आरोग्यमित्र | संपर्क क्रमांक |
बीएचएस लेकव्हय़ू हार्ट हॉस्पिटल | अनिसाबेगम सौदागर | 8792671497 |
बीएचएस लेकव्हय़ू हॉस्पिटल | ||
वेणुग्राम हॉस्पिटल | ||
दक्षता हॉस्पिटल | मोमीन मुल्ला | 9008460008 |
व्हिनस मल्टी सुपर हॉस्पिटल | ||
यश हॉस्पिटल | ||
लाईफलाईन हॉस्पिटल | ||
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल | राकेश चचडी | 8867288573 |
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल | बी. जी. दुकानदार | 9620369786 |
श्री साई हॉस्पिटल, खासबाग | मंजुळा पाटील | 9740228323 |
श्री ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा सेंटर | ||
धन्वंतरी हॉस्पिटल | ||
विजय ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा सेंटर | गीता मडीवाळर | 7019288312 |
स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल | अजित कांबळे | 8892102595 |
अपूर्वा हॉस्पिटल | रमेश रोडबसण्णवर | 7483555855 |
कसबेकर-मेटगुड हॉस्पिटल | ||
लाईफ केअर हॉस्पिटल | ||
नोबल चिल्ड्रन्स हॉस्पिटल | मुजबेबानु मकानदार | 8867387111 |