मलायका अरोराची बेकअपच्या वृत्तांसंबंधी पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु अर्जुनने लेडी लव्ह मलायकासोबतचे छायाचित्र शेअर करत या सर्व अफवांना विराम दिला होता. आता मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एखाद्याला वयाच्या चाळिशीत प्रेम मिळत असल्यास ते नॉर्मलाइज करावे, आयुष्य पंचविशीत संपत नसल्याचे नमूद केले आहे.
वयाच्या चाळिशीत प्रेम मिळत असल्यास ते स्वीकारा. तिशीच्या वयात नवी स्वप्ने पाहणे आणि नव्या गोष्टींची इच्छा बाळगण्यावरून नॉर्मलाइज करा. वयाच्या पन्नाशीत स्वतःच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करू शकतो किंवा शोधू शकतो. या गोष्टीला देखील नॉर्मलाइज करा असा सल्ला तिने दिला आहे.
अर्जुन आणि मलायका यांना बॉलिवूडमधील मोस्ट फेव्हरेट कपल्सपैकी एक मानले जाते. चाहते त्यांच्या रिलेशनशिपबद्दल ऐकून आनंदी झाले होते. दोघांनाही अनेकदा सार्वजनि ठिकाणी पाहिले गेले आहे. अनेक लंच आणि डिनर पार्टीजमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून आला आहे.