वैद्यकीय चाचणीत 30 पैकी 21 रुग्ण पाचव्या दिवशीच संसर्गमुक्त
कोरोनाच्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषध ‘आयुष-64’चे चांगले परिणाम दिसून आले आहेत. जोधपूर एम्समध्ये झालेल्या वैद्यकीय परीक्षणात 30 रुग्णांना सकाळ-संध्याकाळ आयुष-64 कॅप्सूल देण्यात आले, या औषधामुळे 21 रुग्ण औषध दिल्याच्या 5 व्या दिवशीच आरटी-पीसीआरच्या चाचणीत निगेटिव्ह आढळून आले आहेत. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली आहे. आयुष-64 हिवतापाच्या उपचाराकरता वापरले जाते. तसेच याला अँटीवायरल या नावानेही ओळखण्यात येते.
आयुष-64 मधील घटक
सप्तपर्ण : हे कडुलिंबासारखे झाड असते, याच्या पानांचा रस प्राप्त केला जातो.
कुटकी : आल्यासारखी दिसणारी कुटकी हिमालयाच्या पायथ्याशी मिळते, ज्याच्या मूळांचा रस प्राप्त केला जातो.
चिरायता : हिमालयीन क्षेत्रात आढळणारे एक छोटेसे रोप, ज्याचा पूर्ण वापर होतो.
कुबेराक्ष : याच्या बियांपासून रस प्राप्त करत त्याचा अंतर्भाव केला जातो.