प्रतिनिधी / बेळगाव
आय केअर चॅरिटेबल ट्रस्ट बेंगळूर व आंतरराष्ट्रीय चित्रकार भीमराव मुरगोड यांच्या स्मरणार्थ नेत्र तपासणी शिबिर आणि कोरोना योद्धय़ांचा सत्कार असा कार्यक्रम नुकताच पार पडला. किणये येथील सरकारी हॉस्पिटलच्या सभागृहात आशा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. रुग्णांवर कसे उपचार करावेत, याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे हिरेबागेवाडी टोलनाका येथे ट्रक चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. याशिवाय कोरोना योद्धे, आशा कार्यकर्त्या व ट्रक चालक अशा एकूण 2 हजारांहून अधिक जणांना एन-95 मास्क वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाअंधत्व नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, डॉ. तुक्कार, भारत संचार निगमचे डीजीएम मल्लिकार्जुन ताळीकोटी, सामाजिक कार्यकर्ते रवी होंगल, प्रशांत बाणावलीकर, संतोष होंगल आदी उपस्थित होते.