कोलकाता
हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित 28 सामने रद्द केल्याची घोषणा लवकरच स्पर्धा आयोजकातर्फे केली जाईल. कोरोना महामारीमुळे 3 मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे ही स्पर्धा अर्धवट स्थितीत रद्द केली जाईल. शेवटच्या चार फेऱया बाकी असताना स्पर्धेतील सामने थांबवावे लागले. गुणतक्त्यात मोहन बगानने आघाडीचे स्थान मिळविले असल्याने त्यांना यापूर्वी अधिकृत विजेता म्हणून जाहीर करण्यात आले आहे. इस्ट बंगाल आणि मिर्नव्हा पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी 16 सामन्यांतून समान 23 गुण घेतले असून रियल काश्मीरने 15 सामन्यांतून 22 गुण मिळविले आहेत.