नरेंद्र पाटील उद्या आपली भूमिका जाहीर करणार
प्रतिनिधी/ सातारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक घटना घडत आहेत.त्यातील एक म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय.या निर्णयाचा सातारा जिह्यातील मराठा बांधवांनी सोशल मीडियावर आय सपोर्ट नरेंद्र अण्णासाहेब पाटील हॅश टॅग म्हणून त्यांना सपोर्ट करत महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त होत आहे.दरम्यान, नरेंद्र पाटील हे उद्या दुपारी आपली भूमिका मांडणार आहेत.
मराठा समाजासाठी लढणारा नेता म्हणून पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील झुंझार नेता म्हणून नरेंद्र पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्याकडे महाविकास आघाडीच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ठेवले होते.मात्र, नुकतेच महाविकास आघाडी सरकारने हे महामंडळ बरखास्त करण्यात आले.त्यामुळे जिह्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. आय सपोर्ट नरेंद्र अण्णासाहेब पाटील अशी सोशल मीडियावर चळवळ सुरू आहे.नरेंद्र पाटील हे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत.