सेन्सेक्स 748 तर निफ्टी 203.65 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे देशातील बाजारातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांच्या मोठय़ा लिलावामुळे सेन्सेक्सने मंगळवारी 748 अंकांची तेजी प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे.
मागील चार सत्रात मुंबई शेअर बाजारात घसरण राहिली होती. परंतु चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी मात्र याला ब्रेक लागल्याचे पहावयास मिळाले आहे. मंगळवारी जागतिक सकारात्मक संकेत आणि विदेशी कोषांच्या प्रवाहाच्या मदतीने बाजाराने मजबूत स्थान प्राप्त केले आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 748.31 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,687.91 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,095.25 वर स्थिरावत बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांनी तेजीत राहिले, सोबत एचडीएफसी बँकेच्या समभागांनीही चार टक्क्मयांची वाढ नोंदवली आहे. यामध्ये एचडीएफसीची तेजी येण्यामागे रिझर्व्ह बँकेने शशिधर जगदीशन यांना तीन वर्षासाठी बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यास मंजुरी दिल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे मारुती सुझुकी, ऍक्सीस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग नफ्यात राहिले असून दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. देशातील मोठय़ा कंपन्यांच्या कामगिरीच्या मदतीने बाजाराला तेजी प्राप्त करता आली असून यासोबत विदेशी बाजाराचीही मदत झाली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी निव्वळ स्वरुपात 7,818.49 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केल्याचाही प्रभाव मंगळवारी राहिला आहे. आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की हे नफ्यात राहिले आहेत. प्रारंभीच्या काळात युरोपीय बाजार तेजीत होते. जागतिक बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 1.61 टक्क्मयांनी नुकसानीसोबत 43.44 डॉलर प्रति डॉलर बॅरेलवर होते.