प्रतिनिधी / बेळगाव
केएलईएस आरएलएस विज्ञान महाविद्यालयात क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध संघांचा उद्घाटन समारंभ नुकताच सी. व्ही. रामण सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व विद्यमान जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी ते म्हणाले, आपल्याला शिक्षण देणाऱया प्रत्येक गुरुचे आपण स्मरण ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धात्मक भावना जोपासायला हवी. प्रशासकीय परीक्षांना सामोरे जाऊन उत्तम अधिकारी होण्याचे ध्येय ठेवा, असेही ते म्हणाले. अध्यक्ष व कॉलेजचे कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष एल. व्ही. देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य एस. जे. नंजप्पण्णावर यांनी स्वागत केले. प्रा. बी. एस. कवळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अपूर्व करिकट्टी यांनी प्रार्थना सादर केली. सुश्मिता देशपांडे व मौनेश बडिगेर यांनी सूत्रसंचालन केले.