बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार सध्या अस्तित्त्वात असलेल्या आरक्षणामध्ये फेरबदल करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध समुदायांच्या मागण्यांनुसार पुढे जाण्याच्या मार्गावर चर्चा करीत असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी सांगितले.
येडियुरप्पा यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी आपले मत व्यक्त केली आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याच्या मार्गावर चर्चा सुरू आहे . कसे आणि काय करावे, यावर तर्हा सुरु असल्याचे म्हंटले आहे. प्रबळ व्होकलीगा आणि वीरशैव-लिंगायत यासह विविध समुदायांकडून विद्यमान आरक्षण कोट्यात सुधारणा करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृह आणि कायदा मंत्री बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्र्यांनी विविध मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या मतांची दखल घेतली आणि सरकारने कायदेशीर तज्ञांकडून सूचना घेण्याबाबत तसेच यासंदर्भात कोर्टाच्या आदेशांचा आढावा घेण्याविषयी सुचवले.